Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब समाजकारण करणारे लोकनेते


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, मराठवाड्याचे भूमिपुत्र, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त ०३/०६/२०२४ रोजी मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) आणि मित्रपरिवार यांच्या वतीने पिंपळे गुरव येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) चे खजिनदार दत्तात्रय धोंडगे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. A Tribute to Late Gopinath Munde

यावेळी संघाचे अध्यक्ष / संचालक अरुण पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वाभिमान व संघर्ष हे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिठ्य होते, मुंडे यांच्या जाण्याने आपला महाराष्ट्र पोरका झाला, गोपीनाथ मुंडे हे सर्व जनतेचे आधारस्तंभ होते आणि खऱ्या अर्थाने ते एक जाणता नेता होते म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती असे म्हणून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. pcmc


गोपीनाथ अनाथांचे नाथ होते.

मराठवाड्याच्या मातीतील सळसळत्या रक्तामध्ये ज्या लोकनेत्याचा जन्म झाला ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. महाराष्ट्राला दिशा देण्यात प्रगतशील करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर कामे केलेली आहेत. तन,मन,धन हे संपूर्णपणे अर्पण करून त्यांनी देशाची सेवा केली. ते गोपीनाथ नावाप्रमाणेच अनाथांचे नाथ होते. संपूर्ण आयुष्य संघर्षमय होत गरीबांचा कैवारी म्हणजे गोपीनाथ, आज तुम्ही हवे होतात. असे मनोगत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी प्रबोधनकार शारदा मुंढे यांनी मराठवाडा भुमीपुत्र यांच्या जीवनावर आधारित येणारी संकटे, कष्ट यांना त्यांच्या मार्मिक भाषे मध्ये विचार मांडले. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नाथाचा नाथ जो तोच गोपीनाथ यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्री पदा पर्यंत केलेली कार्य उल्लेखनीय आहेत. tribute to late Gopinath Mundhe

संघाचे मीडिया प्रमुख अमोल लोंढे यांनी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

---Advertisement---

यावेळी ह्युमन राईटस चे सदस्य श्री अण्णा जोगदंड, प्रबोधनकार शारदा मुंडे, दत्तात्रय धोंडगे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक /अध्यक्ष अरुण पवार, शिवकुमारसिंह बायस, अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles