Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वृक्षारोपण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव यांच्या संयुक्तपणे पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. (pcmc)

श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त अरुण पवार व धारूरचे सरपंच बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(pcmc)

या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पाचशे रोपांचे वृक्षारोपण करून करून करण्यात आली. यामध्ये सर्व देशी रोपे लावण्यात आली. यावेळी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘झाडांना घाला पाणी, ते वाढवतील पाऊस पाणी’ हा विचार मांडण्यात आला. निसर्गाच्या संवर्धनासाठी युवक ते ज्येष्ठ नागरिक स्वंयप्रेरणेने या उपक्रमात सहभागी झाले होते.

---Advertisement---


यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, ह. भ. प. निवृत्ती बोरकर महाराज, प्रबोधनकार शारदा मुंडे, ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, ह.भ.प. ढमाले मामा, वृक्षमित्र अरुण पवार, आण्णा जोगदंड, भारती कुंभार, अमोल लोंढे, वैजयंती पुजारी, बबन पुजारी, नीलम दिक्षीत, मंदा जगदाळे, सुमन कारखानीस, शिवकुमार बायस, अशोकसिंह इंगळे, विशाल मुंडे, आशिष वाणी, मल्हार बैस, सुनिल रामगडे, उज्ज्वला रामगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव गोपाशेठ पवार, गरेश राजपूत, शशिकांत कुलकर्णी, डी. एम कोळी, पृथ्वीराज इंगळे, वर्षा घायाळ, हरीभाऊ घायाळ आदी मान्यवर उपस्थित होते. (pcmc)

पाच हजार वृक्ष लागवड व पाच हजार वृक्ष वाटपाचा संकल्प : अरुण पवार

बदलते वातावरण (Global warming) लक्षात घेऊन मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वर्षभरात ५००० वृक्ष लागवड आणि ५००० वृक्ष वाटपाचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात भंडारा डोंगर येथे 500 रोपांचे वृक्षारोपण करून करण्यात आली. उर्वरित 4500 वृक्ष लागवड पुणे जिल्हा, मराठवाडा, धारूर, हिप्परगा, रवा, आपसिंगा, मोरडा, वाडी बामणी, केशेगाव, बावी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. Tree plantation in marathwada

---Advertisement---

कार्यक्रमाचे नियोजन मराठवाडा जनविकास संघाने केले, तर वृक्षमित्र अरुण पवार यांनी वृक्षप्रेमींचे आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा

मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !

रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा

नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव

कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी

नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी

ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles