पीसीसीओईआर मध्ये ‘टेक्नोव्हेट २०२५’ महोत्सव उत्साहात साजरा (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जीवनात अनेक अडचणी, समस्या येतात. परंतु त्याकडे सकारात्मकपणे पाहिले तर नवीन संधी दिसते. या संधीतून नवनवीन संकल्पना उदयास येत असतात त्यांचे वास्तवात रूपांतर करून त्या आत्मसात करा आणि त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांनी केले. (PCMC)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘टेक्नोव्हेट २०२५’ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. राजेंद्रकुमार शर्मा आणि संगीता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये विविध तांत्रिक व सर्जनशील प्रकल्प सादर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्रो कोड, एरर ४०४, ब्रिजिंग माईंड्स, कॅड ओ क्रिएट, इलेक्ट्रोथॉन या नाविन्यपूर्ण व रोचक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि टीमवर्कद्वारे आपली कौशल्ये सादर केली. (PCMC)
स्वागत प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रास्ताविक डॉ. शिवगंगा गव्हाणे आणि आभार प्रा. प्रीती राजपूत यांनी मानले. विद्यार्थी समन्वयक वैभवी लाटे, प्रज्ञा पानसरे, कौस्तुभ पाटील आणि आराध्या मिनाजगी यांनी आयोजनात सहभाग घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : नवं कल्पना वास्तवात रूपांतरित करा – डॉ. राजेंद्रकुमार शर्मा
---Advertisement---
- Advertisement -