Tuesday, July 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आळंदी रोडवरील साई मंदिर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला!

PCMC : आळंदी रोडवरील साई मंदिर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला!

लक्ष्मीनारायण सोसायटीसह परिसरातील नागरिकांना दिलासा PCMC

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘मार्ग निघाला’


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वेगाने विकसित होणाऱ्या चऱ्होली येथील लक्ष्मीनारायण सोसायटी परिसराची आता ‘वाहतूक कोंडीमुक्त’ होणार आहे. श्री. साई मंदिर आणि परिसरातील वाहतूक नियंत्रण आणि उपाययोजना याबाबत महापालिका, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि मंदिर व्यवस्थापनाने एकत्रित पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुणे-आळंदी रस्त्यावरील साई मंदिर येथे होणाऱ्या ट्रॅफिक समस्येवरती उपाय आणि लक्ष्मीनारायण सोसायटीतील व परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. pcmc news

आळंदी रोडवरील लक्ष्मीनारायण सोसायाटी व परिसरात सुमारे १० हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. श्रीक्षेत्र आळंदी, औद्योगिक पट्टा चाकण, पुणे व पिंपरी-चिंचवडच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच साई मंदिर असल्यामुळे चौकातील सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नियमितपणे करावा लागत होता. pcmc

या पार्श्वभूमीर भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिका, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि मंदिर व्यवस्थानाचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. त्यामुळे सविस्तर चर्चा करुन वाहतूक नियंत्रण आणि सक्षमीकरण याबाबत तोडगा काढण्यात आला. pcmc

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुणे- आळंदी रोडवरील साई मंदिर परिसरातील सर्व्हिस रोडवर मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्व्हीस रोड अरुंद असल्यामुळे भाविक मुख्य रस्त्यावरच शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग करीत असतात. त्यामुळे मंदिराच्या मागील बाजून लक्ष्मीनारायण नगर येथे हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना वसाहतीमध्ये जाण्याकरिता सर्व्हिस रोडचा वापर करावा लागतो. pcmc

भाविकांनी दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावरच पार्क केल्यामुळे विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी नियमितपणे होत आहे. वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी सदर बैठक घेण्यात आली. pcmc news

पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर म्हणाले की, वाहतूक कोंडी किंवा साई मंदिर व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. मंदिराच्या आवारातील सर्व्हीस रस्त्यावर वाहनांचे पार्किंग पूर्णत: बंद केले आहे. त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून ३ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच, वाहतूक पोलीस कर्मचारी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीनवेळी या ठिकाणी ‘राउंड’ करणार असून, पार्किंग पूर्णत: बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. pcmc

प्रतिक्रिया :

लक्ष्मीनारायण चौक- साई मंदिर येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभाग, आरटीओ विभाग आणि महापालिका संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत सूचना केली होती.

मंदिर व्यवस्थापनाने कायमस्वरुपी वार्डनची संख्या वाढवण्याची सूचना केली. परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी वाहतूक नियंत्रणाबाबत तक्रारी केल्या होत्या. काल मिटिंग झाली आणि आज कार्यवाही सुरू केली आहे. ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी विधानसभा ’’ अशी मोहीम आम्ही सुरू केली असून, नागरिकांनी परिवर्तन हेल्पलाईन : 93 79 90 90 90 वर सूचना आणि रिपोर्ट करावा, असे आवाहन केले आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

माझगाव डॉकमध्ये 512 रिक्त जागांसाठी भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय