पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच शुल्क घेऊनही परवाना वाटप झाला नाही. फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. यासह अनेक मागण्यांसाठी शहरातील फेरीवाल्यांचा मोर्चा गुरुवारी (दि. २३) पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडकणार आहे. टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने फेरीवाला समितीच्या सदस्या आशा बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार आहे. (PCMC)
याबाबत पंचायत चे वरिष्ठ उपाध्यक्ष दामोदर मांजरे व कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील 20 हजार टपरी, पथारी, हातगाडीधारकांचा सर्वे करण्यात आला आहे.
यापैकी 16 हजार लाभार्थ्यांना पात्र करण्यात आले असून त्यांना लायसन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लायसन देण्यासाठी मनपाच्या वतीने 1 हजार 400 रुपये घेतले जात आहेत. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र अमानुषपणे अतिक्रमण कारवाई करून गोरगरीब मागासवर्गीय जनतेचा माल जप्त करून अन्याय अत्याचार केले जात आहेत.
ई क्षेत्रीय कार्यालय, क क्षत्रिय कार्यालय, ग क्षेत्रीय कार्यालय सह शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे अमानुषपणे अतिक्रमण कारवाई सुरु आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने फेरीवाला कायद्यास मंजुरी दिली आहे. त्यावरून फेरीवाला कायद्याच्या अनुषंगाने सर्व टपरी, पथारी, हातगडधारकांचा सर्वे करून त्यांना लायसन देणे. त्यांना पक्या गाळ्यामध्ये पुनर्वसन करणे. त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवणे. तसे त्यांच्यावरील अमानुष कारवाई थांबवणे, अशा प्रकारचे आदेश धोरण करण्याचे कायदा मंजूर केलेला आहे. केंद्र सरकारने नुकतेच पंतप्रधान स्वयंनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना 20 हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. एका बाजूला कर्ज मंजूर केल्या असल्याने सदर हप्ते कसे भरायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील फेरीवाल्या कायद्याचे अंमलबजावणी झाल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये, अशा प्रकारचे आदेश पारित केले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. (PCMC)
या बाबात संघटनेच्या वतीने मागील आठवड्यामध्ये महानगरपालिका आयुक्त शेखर शिंग यांना निवेदन देण्यात आले होते परंतु या नियोजनावरती कोणती कारवाई करण्यात आली नाही यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
फेरीवाला समिती सदस्य सौ आशा बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढायला या मोर्चात महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बळीराम काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष दामोदर मांजरे, राज्य सल्लागार हनुमंत लांडगे, फेरीवाला समिती सदस्य ममता मानुरकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रमेश शिंदे कार्याध्यक्ष इस्माईल बागवान, उपाध्यक्ष महेबुब पटेल, मलिक शेख, शिवाजी कुडूक, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाई सरदार, उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष सरोजा कुचेकर, महिला उपाध्यक्ष नाणी गजरमल, ज्योती कांबळे, दिघी विभाग अध्यक्ष रोहित तापकीर, दिव्यांग विभागाच्या महिला अध्यक्षा वासंती जाधव, आदी आंदोलन वेळीउपस्थित राहणार असल्याची माहिती सरचिटणीस प्रकाश यशवंत यांनी यावेळी दिली.
संघटनेच्या प्रमुख मागण्या (PCMC)
१) महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने सुरू केलेली अतिक्रमण कारवाई थांबवावी.
२) फेरीवाल्यांना लायसन वाटप प्रक्रिया सुरु करावी.
३) फेरीवाल्यांचे पक्क्या गाळ्यामध्ये पुनर्वसन करण्यात यावे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित