पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने दोन दिवसीय 39 वे. वार्षिक अधिवेशन २०२४ भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे संपन्न झाले. (PCMC)
त्यात एकूण 489 नामांकने 94 संस्थांकडून प्राप्त झाली होती आणि 1682 जणांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता. दोन दिवसीय 39 वे वार्षिक अधिवेशनात 360 केस स्टडीज, 62 घोषणा आणि 62 पोस्टर्स स्पर्धकानीं सादर केले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सुवर्ण, रजत, कास्य पदके प्रदान करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन लुमॅक्स इंडस्ट्रीज लि. चे व्हाईस प्रेसिडेंट (ऑपरेशन) राजेश डुब्बेवार यांनी केले व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तर; समारोप प्रसंगी विजेत्यांना पुरस्कार हेड एचआर-रिशाल गडाख, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पॉलिस्टर विभाग, पाताळगंगा यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन टी. रविशंकर, प्लांट हेड, एलअँडटी डिफेन्स, एसएससी तळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवर्तन या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले. (PCMC)
समारोप प्रसंगी विजेत्यांना पुरस्कार नीरज अग्रवाल, प्लांट हेड, टाटा मोटर्स, कार प्लांट हेड, पिंपरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, पदाधिकारी डॉ. अजय फुलंबरकर, प्रकाश यार्दी, भूपेश माल, पवनकुमार रवंदळ, आनंद क्षीरसागर आदी उपस्थित होते.
टाटा मोटर्सचे कार प्लांट हेड नीरज अग्रवाल यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बोराटे, चंद्रशेखर रुमाले, रहीम मिर्झा बेग यांनी परिश्रम घेतले.
दोन दिवसीय अधिवेशनात आनंद ग्रुप, बेलराईज इंडस्ट्रीज लि., कमिन्स इंडिया लि., एक्साइड इंडस्ट्रीज लि., गरवारे ग्रुप, आयएसी इंटरनॅशनल, जेसीबी इंडिया, जेएसडब्ल्यू, किर्लोस्कर ग्रुप, लुमॅक्स ग्रुप, मदरसन ग्रुप, एनटीपीसी संधार ग्रुप, एसकेएफ, एसएफएस ग्रुप, स्पार्क मिंडा, उनो मिंडा, टाटा ऑटोकॉम्प ग्रुप, टाटा मोटर्स, विल्स इंडिया आदी कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
PCMC : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वार्षिक अधिवेशनात टाटा कार प्लांटला सर्वाधिक सुवर्ण पदके
संबंधित लेख