लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४” या मेगा शो 2.0 चे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये (Beauty compitition) महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, कला, संगणक शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. pcmc
यामध्ये नागपूर ची कु. तन्वी मेश्राम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र गतविजेत्या सई तापकीर, सुमिता काटकर आणि नैना वेदपाठक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक मुंबईच्या पूनम सावंत यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक कू. निकिता हांगे यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. Beauty compilation pcmc
लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक पुण्यातील कू. अनविका मोरे दहा हजार रोख आणि द्वितीय पारितोषिक औरंगाबादच्या सात हजार रोख कू. वेदिका मुंढे आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम तळेगाव दाभाडे येथील कू. दुर्वा शेटे यांनी पटकावले.
परीक्षक म्हणून नैना वेदपाठक, गतविजेत्या सई तापकीर, प्रा. सूमिता काटकर यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि स्मिता महादेव यांनी केले. आऊटफिट कांचन सांडभोर आणि रिवाज रेंटल च्या चैत्राली मरळीकर पाटोळे यांनी केले. pcmc news
वेशभूषा आणि केशरचना नेहा ठाकूर यांनी केली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विमा सल्लगर गणपत शिंदे आणि प्रेरणा शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य राजकुमार सरोदे उपस्थित होते. pcmc
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले. आसावरी कुलकर्णी – बोडस यांनी आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, सारिका डोलणारे आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.


हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक