मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन (PCMC)
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने मनपा शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य करिता DBT च्या माध्यमातुन रक्कम न देता १० ठेकेदार नेमून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे यात गैरकारभार तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा झाला आहे त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या आहेत. (PCMC)
अशा अनेक तक्रारी झाल्या असून सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त बघ्याची भुमिका घेत आहे तरी मनपा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
डीबीटीच्या नावाखाली ठेकेदारीचा पुन्हा घाट
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ४२ हजार, माध्यमिक शाळांमध्ये ९ हजार असे पहिली ते दहावी एकूण ५१ हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी मनपा ‘ डीबीटी ‘ माध्यमातुन शालेय साहित्य खरेदीसाठी अनुदान देत होती. पण यावर्षी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने विद्यार्थी यांना ‘डीबीटी’द्वारे थेट शालेय साहित्याचे रोख रक्कम देणे अपेक्षित आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जाभंळे पाटील, सहायक आयुक्त विजय थोरात यांनी डीबीटीच्या नावाखाली ठेकेदारीचा पुन्हा घाट घालून महानगरपालिकेवर न्यायालयीन दावा दाखल केलेल्या २ मोठ्या ठेकेदार यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपये कमविण्याची नवीन शक्कल लढवली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार योजनांतील भष्टाचार आणि ठेकेदारी कामातील रिंग पद्धत रोखण्यासाठी थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश २०१६ ला सर्व शासकीय संस्था यांना दिले होते. गेल्या वर्षी पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शालेय साहित्य वाटप साठी हीच पद्धत अवलंबत होती पण या वर्षी कोणत्या कारणासाठी ही पद्धत न वापरता ह्याच पद्धतीनें महापालिकेने डीबीटी राबविली असे दाखवून जुन्याच ठेकेदाराकडून शालेय साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा न करता क्यूआर कोडव्दारे साहित्य दिले जात आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा कोणाला झाला असा प्रश्न नागरिक यांना पडला आहे. असा सवाल राहुल कोल्हटकर यांनी निवेदनात केला आहे. (PCMC)
आयुक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने मनपा शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य करिता DBT च्या माध्यमातुन रक्कम न देता १० ठेकेदार नेमून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे यात गैरकारभार तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा झाला आहे त्याच्या बातम्या वर्तमान पत्रात आल्या आहेत अनेक तक्रारी झाल्या असून सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त बघ्याची भुमिका घेत आहे तरी मनपा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.
***
***