पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, हे चांगले काम करण्यासाठी अनिवार्य आहे. सध्या आपण परिवर्तनाच्या टप्प्यात आहोत. शासकीय कार्यालयात कॉर्पोरेट संस्कृतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, याची सुरवात आम्ही आमच्या पासपोर्ट कार्यालयातून केली आहे. सक्षम भारतासाठी उद्योग आणि एच आर अधिकाऱ्यांसाठी आयोजित ही शिखर परिषद महत्वपूर्ण ठरेल. असे प्रतिपादन प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ अर्जुन देवरे यांनी केले.एव्हीके स्किल फौंडेशनच्या वतीने उद्योग आणि एच आर अधिकारी याच्यासाठी वाकड येथे ‘सक्षम भारत २०२५’ या शिखर परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. (PCMC)
या शिखर परिषदेस अप्पर कामगार आयुक्त अभय गिते, साज टेस्ट प्लांटच्या कार्यकारी संचालक ऋतुजा जगताप,फिनसॉफ्ट एआयचे संस्थापक शैलेंद्र अभ्यंकर, फौंडेशनचे अध्यक्ष आयोजक अमोल कागवाडे, उपाध्यक्ष बळीराम मुतगेकर, सचिव अजित देसवंडिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सक्षम भारत चे संकल्पक अमोल कागवाडे आणि बळीराम मुतगेकर, यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेतील स्थान मजबूत करण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. (PCMC)
यावेळी अप्पर आयुक्त अभय गीते म्हणाले कि, सरकार उद्योगासाठी शेकडो सुधारणा आणि चांगली धोरणे राबवत आहे. आता उद्योगाने या धोरणांचा लाभ घेतला पाहिजेत.
या परिषदेची थीम उत्कृष्ट आहे आणि एच आर व्यावसायिकांनी स्वतःला विकासासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे, त्यामुळे अनेक आव्हाने आणि संधी उपलब्ध असेल. त्यासाठी सज्ज रहा. असा सल्ला दिला.
या परिषदेच्या आयोजनासाठी आणि प्रभावी पॅनेल चर्चांसाठी सरफराज मणेर, श्रीकृष्ण गंधे, अजित देसवंडीकर, नवनाथ सूर्यवंशी , राहुल निंबाळकर , रमेश बागल, मधुकर सूर्यवंशी, प्रदीप मानेकर , किशोर शिंदे, अर्जुन माने, आणि टिकमसिंग शेखावत यांनी परिश्रम घेतले.
सीईओ पॅनेल-विषय- “भारताला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करणे” या चर्चा सत्रात आयपीएस ग्रुपचे ग्लोबल सीईओ अलोक झा, फिनसॉफ्टएआयचे शैलेंद्र अभ्यंकर, के पॉईंटचे अध्यक्ष श्रीधर शुक्ला, महिंद्रा प्रकल्प प्रमुख संजय क्षीरसागर,साज टेस्ट प्लांट चे रुजुता जगताप यांनी आपले मत नोंदवले.
सीएक्सओ पॅनेल “भारताच्या भविष्यातील प्रगतीसाठी एक सक्षम आणि नाविन्यपूर्ण वातावरणाची निर्मीती करणे” यावरील चर्चा सत्रात एसेंचरचे व्यवस्थाकीय संचालक श्रीकांत सारडा, डॉ. अनिल जाधव, जॉईंट डायरेक्टर, डीव्हीईटी अनु सेठी, संचालक एचआर, एफईव्ही इंडिया विनोद बिडवाईक, सीएचआरओ, सकाळ मिडिया ग्रुप हे सहभागी झाले होते. (PCMC)
“जागतिक मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आणि अनुकुल एचआर धोरण राबविणे यावरच्या परिसंवादात विक्रम म्हस्के, सीएचआरओ, केएसपीजी समीर गाडगीळ, उपाध्यक्ष एच आर, विप्रो श्रीमती कविता कालीकर, प्लांट एच आर हेड, जॉन डीअर ल्युकाडिया मिली संदीप-ग्रुप सीएचआरओ, पॉशिस मेटल्स,टिसीएसचे रिजिनल एच आर हेड, शेखर कांबळे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
” सुधारित कामगार कायदा लागु करण्यासाठी, कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वय साधन्यास प्राधान्य देणे ” या विषयीच्या चर्चा सत्रात राहुल बागले, उपाध्यक्ष मानव संसाधन, अल्ट्रा कॉर्पोटेक आमदार भाई जगताप,अॅड. आदित्य जोशी, आमदार सचिन आहेर, महिंद्रा कंपनीचे एचआर संग्रामसिंह देशमुख, अॅड. नवराज जलोटा यांनी आपले मत नोंदवले. (PCMC)
सक्षम भारत शिखर परिषद २०२५ ने भारतातील शिखर परिषदांसाठी नवीन मानक स्थापित करत सर्वसमावेशक नेतृत्व, नाविन्य आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देत भारताच्या जागतिक महाशक्ती म्हणून उदयाच्या मार्गाला गती दिली आहे.
सक्षम भारत शिखर परिषद २०२५ ने भारतातील शिखर परिषदांसाठी नवीन मानक स्थापित करत सर्वसमावेशक नेतृत्व, नाविन्य आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देत भारत एक जागतिक महाशक्ती म्हणून उदयास येण्यास गती दिली आहे.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त निखिल वाळके, डॉ झोपे,ऍड. प्रशांत क्षिरसागर, अमन राजाबली, धैर्यशील भोसले, अमोघ सोमण, उदयसिंह खरात, अभिजीत पवार, आचार्य, विनायक पाटील, महेंद्र फणसे, महेश करंदीकर यांची उपस्थिती लाभली. श्रीमती वहिदा पठाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि नवनाथ सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.