पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – अभिराज फाउंडेशन वाकड हि “दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा “असून तेथे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत गडदे (राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय कोच व प्रथमोपचार तज्ञ) हे उपस्थित होते. (PCMC)
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय 50 मीटर रनिंग,50 मीटर वॉकिंग, शटल रन,पळत जाऊन मनोरा पाडणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अभिराज फाउंडेशनच्या पालक प्रतिनिधी श्री प्रफुल्ल खेनंट व सौ मनीषा तरडे उपस्थित होते. क्रीडा दिनाची सुरुवात क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली व क्रीडा शपथ घेण्यात आली केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना वंजारी मॅडम तर पाहुण्यांची ओळख चिगरे मॅडम यांनी तर बक्षीस वाचन रुपनाळकर मॅडम यांनी केले. (PCMC)
यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत गडदे यांनी पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. विकास जगताप व ऋषिकेश मुसूडगे क्रीडा शिक्षक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यांमुलांना मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते. आभार प्रदर्शन हांडे मॅडम यांनी केली केले. अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर स्वाती तांबे व रमेश मुसूडगे सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.