Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ‘इंद्रायणी थडी महोत्सव’च्या बूकिंगसाठी बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

PCMC : ‘इंद्रायणी थडी महोत्सव’च्या बूकिंगसाठी बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिवांजली संखी मंचच्या पुढाकाराने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू (PCMC)

महिला सक्षमीकरणाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ इंद्रायणी थडी महोत्सवाला यावर्षीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामघ्ये स्टॉल लावण्यासाठी महिला बचतगटांनी अवघ्या आठ दिवसांत ३ हजारांहून अधिक अर्ज घेतले आहेत. (PCMC)

‘‘महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता विकास’’ या उद्देशाने भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्ष पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर प्रतिवर्षी ‘‘इंद्रायणी थडी महोत्सव’’ आयोजित केला जातो.

भोसरी आणि परिसरातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. या करिता आयोजित केला जाणारा महोत्सव महाराष्ट्रातील सर्वाधिक उलाढाल आणि अफाट गर्दीचा म्हणून ओळखला जातो. इंद्रायणी थडी महोत्सवासाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटांना यावर्षी प्राधान्य देण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि लकी ड्रॉ द्वारे स्टॉल वाटप…

दि. २१ सप्टेंबर रोजी स्टॉल बुकींगचे अर्ज वाटप सुरू करण्यात आले. अर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आमदार महेश लांडगे यांचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, भोसरी येथे अर्जवाटप करण्यात येत आहे. सुरुवातीच्या आठवडाभरात ३ हजारहून अधिक अर्ज वापट करण्यात आले आहेत. या महोत्सवामध्ये एकूण १ हजार स्टॉल वाटप करण्यात येणार असून, स्टॉल पूर्णत: मोफत देण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्ज भरुन सोबत बचत गटांची यादी भरुन द्यावी लागणार असून, त्यानंतरच अर्ज जमा करण्यात येणार आहे. तसेच, इंद्रायणी थडी महोत्सवाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

खाद्य मेजवानीसह विविध स्पर्धा…

इंद्रायणी थडी महोत्सवामध्ये शाकाहारी व मांसाहारी खाद्य मेजवाणीसह विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये डान्स, फॅशन शो, गायन, मंगळागौर खेळ, फिटनेस, फॅन्सी ड्रेस, रांगाेळी, मेहंदी, रिल्स, काव्य, फोटोग्राफी, बेस्ट मेकअप आर्टिंस्ट , शॉर्ट फिल्म, एकपात्री, मेमरी टेस्ट, स्वच्छ सोसायटी अशा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता दि. २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान अर्ज मिळणार आहेत. अर्ज जमा करण्याची मुदत दि. ६ ते १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.


प्रतिक्रिया :

महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन देण्याकरिता प्रतिवर्षी ‘इंद्रायणी थडी’ चे आयोजन केले जाते. यावर्षीसुद्ध भव्य-दिव्य नियोजन करण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अल्पावधीत हा महोत्सव लोकप्रिय झाला आहे. चार-पाच दिवसांत महोत्सवाला लाखो नागरिक भेट देतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे महिला बचत गट आणि विविध लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळते. पावसाचा अंदाज, शाळांच्या परीक्षा आदी बाबींचा अंदाज घेवून, महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय