पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानव अधिकार संस्थेने या वर्षीची दिवाळी फराळ व फळे देऊन दिव्यांग(मतिमंद) मुलांसोबत साजरी केली. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेच्या वतीने ‘चला दिवाळी साजरी करूयात वात्सल्य परिवार सोबत’ हा उपक्रम राबवून मतिमंद मुलांची दिवाळी साजरी केली,या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर आणि पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके उपस्थित होते. (PCMC)
दिव्यांग मतिमंद मुलांना बारा किलो फराळ आणि फळे देण्यात आली तर या उपक्रमात संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मांडगे, समाजसेविका पुष्पा बोत्रे मॅडम, समाजसेविका सुचेता गवते मॅडम आदींनी आर्थिक मदत केली.
आपली दिवाळी तर आपण नेहमी साजरी करत असतो.
पण समाजात असे काही घटक आहेत की त्यांची दिवाळी होत नसते तर अशांना आपण आपल्या ताटातील एक घास दिला तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्या आयुष्याची कमाई असते.याच भावनेतून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ,पुणे टीम ने पुढे येऊन यावर्षी हा एक अनोखा उपक्रम राबवत समाजात एक आदर्श घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजातील वंचित घटकांबरोबर दिवाळी साजरी करणे,आपले घर सोडून बाहेर जाऊन दिवाळी करणे हे कोणालाही जमत नाही तर त्यासाठी दुसऱ्यांसाठी मदत करण्याची धडपड,समाजीकतेची भावना प्रबळ असावी लागते.समाजसेवेत च देव मानलेल्या भावनेतून आम्ही असे कार्य करत असतो असे पुणे जिल्हा टीम कडून सांगण्यात आले. (PCMC)
दिव्यांग व्यक्तींनाही दिवाळी फराळ मिळणे गरजेचे आहे,सर्व समाज दिवाळी साजरी करत असताना त्यांनाही गोड धोंड हे मिळालेच पाहिजे म्हणून,हा उपक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या प्रेरणेतून राबविला गेला असून पुणे टीम च्या या उपक्रमासाठी वरिष्ठांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेच्या मार्फत नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात जसे की रद्दी दान,शालेय साहित्य वाटप , गरिबांना मदतीचा हात.संस्थेच्या माध्यमातून पुढेही अनेक स्तुत्य असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले तर या अशा अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपणही संस्थेला जोडले जाऊ शकता.
निस्वार्थ समाजवेक बनायचे असेल तर आपण किशोर थोरात यांना 8796824682 या नंबर वर संपर्क करून संस्थेच्या सोबत जोडले जाऊ शकता.
हेही वाचा :
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर