Sunday, February 16, 2025

PCMC : तालेरा स्कूलमध्ये स्नेह संमेलन उत्साहात

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर : कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मोतीलाल तालेरा इंग्लिश मेडियम स्कूल मोशी पुणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करता अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे स्नेहसम्मेलनाचा सांस्कृतिक कार्यकम उत्साहात संपन्न झाला. कार्यकमाची सुरूवात प्रमुख पाहुणे, शाळा समितीचे खजिनदार सुभाष अग्रवाल , तसेच संस्थेचे अध्यक्ष वालचंद डि संचेती , संस्थेचे उपाध्यक्ष उदय पुंडे , सचिव बाबुराव जावळेकर , समिती सदस्य डॉ इम्तियाज मुल्ला उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली . तसेच प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.


पूर्व प्राथमिक शाळेच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, डायरेक्टर ऑफ ‘लीगल सोल्युशन कंपनीचे’ ऍड अभिताभ मेहता उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक विभागाचे ‘रिश्ते’ व पूर्व प्राथमिक विभागाचे ‘इंद्रधनुष्य’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रत्येक नात्यातील गोडवा’ व ‘एकतेचे’ नेत्रदीपक प्रदर्शन सादर करत एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणारे नृत्य व नाटिका सादर करून पालकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा शादबार व पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दिपाली होणाळ त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंदांनी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles