पिंपरी चिंचवड : प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील शिवार चौक हा नाशिक फाटा ते हिजंवडी बीआरटीएस रस्त्यावरील मुख्य चौक असुन शहरातील व परिसरातील नागरिकाना येण्या जाण्यास हा रस्ता सोयीस्कर असुन नागरिक या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात करतात त्यामुळे शिवार चौक येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. (PCMC)
यामुळे या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याचा नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता याबाबत परिसरातील नागरिकांनी व सोसायटीतील रहिवासी यांनी देखील या वाहतुक कोडी बाबत मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांच्याकडे तक्रारी करीत होते. (PCMC)
त्यानुसार नाना काटे यांनी वेळोवेळी वाहतुक विभाग व संबधित महापालिकेच्या बीआरटीएस विभागाशी चर्चा करून वाहतुक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी शिवार चौकातील सर्कल काढण्याचा सुचना केल्या होत्या. (PCMC)
यानुसार काल मध्यरात्री महापालिकेच्या बीआरटीएस विभाग व वाहतुक पोलीस विभाग यांच्या वतीने शिवार चौक याठिकाणी असलेला सर्कल काढुन टाकण्यात आला त्यामुळे आता शिवार चौकातील वाहतुक कोडीतुन नागरिकांची सुटका होणार आहे नाना काटे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे व नागरकिांना वाहतुक कोडीतुन सुटका केल्या बद्दल नागरिकांनी नाना. काटे व शितल काटे यांचे आभार मानले आहेत.