पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शिवतेज नगर, चिंचवड येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. (PCMC)
याप्रसंगी चिखली पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी हजर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षाची परकीयांची सत्ता उलथून लावली व हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे राज्य रयतेचे राज्य आहे, हे लोक कल्याणकारी राज्य असून लोकांच्या रयतेच्या कल्याणासाठी आहे, प्रजेचे प्रश्नाची महाराजांना जाण होती, म्हणून महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. असे मनोगत याप्रसंगी बहिरवाडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी चिखली पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचारी, दामिनी ग्रुपच्या महिला पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा, नंदकुमार शिरसाट, महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारिका रिकामे, माही चौरे, शोभा नलगे, जगन्नाथ पाटील, राणे काका, क्षमा काळे, कैलास सराफ, स्मिता शिरसाट, राजेंद्र केंजळे इ. उपस्थित होते. (PCMC)
तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून स्वामी समर्थ मंदिरात भावगीत भक्ती संगीताचा संगीताचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रसाद कोठी, दिगंबर राणे, वंदना रावलल्लू, सतीश काळे इत्यादी गायक व वादकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे व इतर गाणी सादर केली.
कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
PCMC : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी
- Advertisement -