Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जेष्ठ कामगार नेते शिवाजी शेडगे यांचे निधन

PCMC : जेष्ठ कामगार नेते शिवाजी शेडगे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष शिवाजी बबनराव शेडगे ( वय 69 ) याचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने आज (बुधवारी) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी शेडगे यांनी पतितपावन संघटनेत काम केले. (PCMC)

१९९० च्या दशकातील तरुण कामगार नेत्यांपैकी ते एक स्वतंत्र विचारसरणीचे कामगार पुढारी होते.
पिंपरी चिंचवडच्या वैचारिक राजकीय प्रवाहात त्यांनी स्वतःचे वेगळे राजकीय स्थान जपले होते.
टाटा मोटर्स कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि पतितपावन संघटनेत त्यांनी शहर पातळीवर युवक विद्यार्थ्याना संघटित केले होते.

भाजपामध्ये पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्यात विविध संघटनात्मक पदावर काम केले. बुधवारी पहाटे राहत्या घरी त्यांना ह्दयविकाराचा धक्का बसला.त्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेष्ठ नेते ज्ञानेश्वर शेडगे यांचे बंधू तर माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांचे ते चुलते होत. शिवाजी शेडगे यांच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता काळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक प्रकट करण्यात येत आहे. (PCMC)

संबंधित लेख

लोकप्रिय