Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : जेष्ठ कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांची उस्ताद झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – झाकीर हुसैन यांचे नुकतेच निधन झाले, यावर विश्वासच बसत नाही. संपूर्ण कला जगत झाकीर भाईंच्या अशा अचानक जाण्याने पोरके झाले आहे. (PCMC)

माझे व झाकीर भैयांचे संबंध १९८० साला पासूनचे आहेत, पं.बिरजूमहाराज व झाकीर बरोबर मी प्रथम कथक नृत्य सोलापूर येथे सादर केले. त्यावेळी झाकीर भाईची पत्नी टोनी भाभी पण होती. त्यानंतर बिरजू महाराज यांचे बरोबर कार्यक्रमात झाकीर भाई बरोबर कायम भेटी होत गेल्या व झाकीर भाई बरोबर अधिक घनिष्ठ संबंध झाले.

मला ते नंदू म्हणून हाक मारत असत. १९९५ साली शिकागो येथे एका कार्यक्रमात झाकीर भाईंनी तबला वाजवला व मी नृत्य केले हे माझे खुप मोठे सौभाग्य! त्यांच्या बरोबर च्या ५० वर्षाच्या सहवासातील आठवणी आज जाग्या झाल्या आहेत. (PCMC)

झाकीर भाईंच्या जाण्याने कला क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती आता कधीही भरून येणार नाही. आज कला क्षेत्रातील लखलखता ध्रुव तारा गळुन पडला आहे. ईश्वर झाकीर हुसेन भाईच्या आत्म्यास शांती देवो!

जेष्ठ कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles