पिंपरी चिंचवड – महात्मा फुलेनगर, चिंचवड मधील ज्येष्ठ नागरिक संघाचा १२ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्याच विरूंगळा केंद्रात हा एकदिवसीय समारंभ रंगला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. (PCMC)
संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त मेजर दत्ताजी साबळे यांनी भूषविले. (PCMC)
दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे संदेश देणारे यशवंत कन्हेरे व शंभर गड किल्ले यशस्वी ट्रेक करणारे विश्वास सोहोनी ज्येष्ठ नागरिकांचे विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच वयाची पंचाहत्तरी पार करणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिक मनकर्णिका महाजन, सरोजनी मुळे, गायकवाड व मधुकर धकाते यांचाही हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे यांनी चालू वर्षांतील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला. (PCMC)
डॉ. अजित जगताप यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताला भारत बनवुया
पहलगाम हल्यानंतर सर्वांनी पाहिले, आपण ऑपरेशन सिंदुर राबविले आपल्या जवानांनी दहशतवाद्याना नेस्तनाबूत केले.
आपले सैन्य दल भारताच्या सीमांचे रक्षण करत असताना आपण सर्वांनी भारताला भा-रत बनविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण भक्ती, भाव जपण्यासाठी प्रयल केला पाहिजे. आपली ज्ञान परंपरा, गुरुकुलीय शिक्षण पद्धत, संस्कार, सण, रूढी परंपरा जपण्याचा प्रयल केला पाहिजे आणि या सर्व गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. (PCMC)
आज अनेक षडयंत्राच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीवर जे आघात होत आहेत. वेगवेगळ्या जिहादाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फसवले जात आहे. त्यासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. अजित जगताप यांनी केले.
पुढे असेही म्हणाले की जेष्ठांमध्ये असलेली विविध कौशल्य शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जावून युवकापर्यंत पोहोचले पाहिजेत. प्रत्येक जेष्ठ नागरिक संघाने संस्कार वर्ग तसेच तरुण-तरुणींचे प्रबोधन कार्यशाळा सुरु केले पाहिजे, यातुन आपल्याला मिळालेले अनुभवांचे बाळकडू पुढे देता येईल.
डॉ. अजित जगताप यांचे भाषण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात जगताप यांना पसंतीची पावती दिली.
संघाचे सदस्य विलास रूपटक्के यांनी सर्वाचे आभार मानले. या वर्धापन सोहळ्याच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात प्रसिद्ध गायक संजय मरळ यांचा ‘आठवणीतली गाणी’ या गायनाचा कार्यक्रम रंगला. यात ज्येष्ठांनी नाचून आनंद व्यक्त केला.
शिवानंद चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.