महात्मा फुले नगर, येथे जेष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आयुष्याच्या या वाटेवर आपल्याला मानसिक आधाराची गरज असते, तो आधार देण्याचं काम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात येते.या अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने एकत्र येऊन आपुलकीचा जिव्हाळा निर्माण होतो.
संघाच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. आयुष्यात कितीही वादळं आली तरी उन्मळून न जाता खंबीरपणे उभे राहून ज्येष्ठांनी आपल्याला आदर्श निर्माण करून दिला आहे. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक महासंघाचे स्वीकृत सदस्य अरुण बागडे यांनी केले. pcmc news
महात्मा फुलेनगर, चिंचवड येथील ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी चिंचवड आयोजित १२ सभासदांचा वाढदिवस सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सत्कारमूर्तीना पारंपारिक पद्धतीने औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (Senior citizens Sangh) अध्यक्ष वृषाली मरळ, स्वीकृत सदस्य अरुण बागडे व वाढदिवस असलेल्या सदस्यांचे परिवारही उपस्थित होते. pcmc news
यावेळी अरुण बागडे म्हणाले, अनेक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होत आहेत. तिथे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सुरू असतात. निवृत्ती नंतर जगण्याचा आनंद देणारे हे एक केंद्र असते.
नव्या उमेदीने जगण्याचा आनंद घेण्यात खरच सुख आहे, ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. मित्र, सहकारी आणि कार्यालयीन भेटीगाठी पासून दूर गेल्याची भावना दूर होते, शांत आणि आनंदी जीवनाचा आस्वाद घेता येतो, सामाजिक सुरक्षितता मिळते, एकाकीपणा जाणवत नाही. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता येते. असे अरुण बागडे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत कण्हेरे यांनी केले, सहभोजनाने अभिष्टचिंतन सोहळ्याचे सांगता झाली.


हेही वाचा :
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!