पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे अर्जुन साळुंके याची १४ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली.
एमसीएच्या महाराष्ट्र निमंत्रित लीग ७ ते २२ डिसेंबर या दरम्यान नाशिक मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये राज्यभरातून ७२ टिम सहभागी झाल्या होत्या. यातून उत्तम खेळणाऱ्या ६० खेळाडूची निवड चाचणी घेण्यात आली. यातून सर्वोत्तम १६ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली. उत्तम खेळ खेळल्यानंतरच्या संघात अर्जुनची निवड झाली. राजकोट येथे होणाऱ्या वेस्ट झोन ट्रॉफीसाठी
महाराष्ट्र क्रिकेट संघात खेळणार आहे.
थेरगाव येथील ॲंबिशियस क्रिकेट क्लबमध्ये तो गेली ४ वर्षापासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. एमसीएचे ॲपेक्स सदस्य सुनील मुथा,ॲंबिशियस क्लबचे संचालक संजय बारणे, मुख्य प्रशिक्षक मनिष देसाई, जितेंद्र भारती,रोहित कार्लेकर , सुनील दिवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अर्जुन हा वाकड येथील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इ ८ वित शिकत आहे.
स्कूलच्या संचालिका ज्योतीताई राठोड,मुख्याध्यापक सोनाली बलवतकर,वर्ग शिक्षिका किरण कुमारी,समन्वयक शालिनी नरूला यांनी अर्जुन आणि त्याचे वडील दिग्विजय, आई कविता साळुंके यांचे अभिनंदन केले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC:१४ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये अर्जुन साळुंकेची निवड
---Advertisement---
- Advertisement -