रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ (Alandi)
आळंदी (अर्जुन मेदनकर) : ओळख श्री ज्ञानेश्वरीची संस्कारक्षम मूल्यशिक्षण या उपक्रमातून ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान शालेय जीवनातच शालेय मुलांना देत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास, शालेय मुलांचे जीवनमान उज्जवल सुसंस्कृत होण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम या माध्यमातून ७५ व्या शाळांत सुरु झाला आहे. यातून शालेय मुले निश्चितच सुसंस्कृत घडतील असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांनी केले. (Alandi)
दिघी येथील नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त अनोखी भेट देत प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची या सामाजिक बांधिलकीतील उपक्रमाचे आयोजन संस्थेचे वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव वाळके होते. (Alandi)
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव रवींद्र गायकवाड, संचालक कृष्णकांत वाळके, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील घटक प्रा.श्रीधर घुंडरे, विलास वाघमारे, प्राजक्ता हरफळे, विश्वम्बर पाटील, अर्जुन मेदनकर , शंकर महाराज फफाळ महाराज, मुख्याध्यापक विनोद वाळके, पर्यवेक्षिका मंगल भोसले, समन्वयक शशिकांत पठारे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे हस्ते प्रशालेस माऊलींची प्रतिमा, इयत्ता पाचवी ते आठवीचे सर्व विद्यार्थ्यांना हरिपाठ, संत साहित्य सार्थ हरिपाठ, ओळख ज्ञानेश्वरीची अभ्यासक्रम पुस्तिका सार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तसेच पारायण प्रत देऊन विद्यार्थ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, अध्यात्मिक आवड रुजवून वर्तनात बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून संस्कारक्षम साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रकाश काळे म्हणाले, दिघीची शाळा या उपक्रमातील ७५ वी शाळा असून ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमातून हरिपाठ, ओळख श्री ज्ञानेश्वरीचे माध्यमातून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात संस्कारमूल्य संवर्धन होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येथे होत असल्याचे आम्हाला विशेष आनंद होत आहे. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय आबा गायकवाड यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचे वाढदिवसा निमित्त येथे मूल्य शिक्षण जोपासणारा उपक्रम सुरु होत आहे. एक प्रकारची वेगळी भेट ठरेल.
यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरी ची या उपक्रमात सविस्तर माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी देत शालेय मुलांसह उपस्थितांशी सुसंवाद साधला. या उपक्रमाची गरज यावर त्यांनी विवेचन दिले. मुले सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्हावीत यासाठी शाळा आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. माऊली हे सेवाकार्य करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आमचे यात काहीही योगदान नाही. माऊलींचे साहित्य सर्वसामान्यांन पर्यंत घेऊन जाण्याचे उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे. शालेय मुले आणि उपस्थितांना विविध दाखले देत त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून मार्गदर्शन करीत संवाद साधला. यावेळी माऊलींचे शब्दाचा डबा अर्थात हरिपाठ, ज्ञानेश्वरी आदी संत साहित्याचा असा शब्दाचा डबा, ही मिठाई आणि आईने घरून दिलेला घरचा अन्नाचा डबा सेवन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुलांशी संवाद साधत मुलांनीही मोठा प्रतिसाद देत केलेले आवाहन जय हरी माऊली म्हणत स्वीकारले.
या प्रसंगी प्रा. श्रीधर घुंडरे, अर्जुन मेदनकर आदींनी मनोगते व्यक्त केली. पसायदानाने संस्कारक्षम उपक्रमाचे उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. सूत्रसंचलन व आभार दादासाहेब चितळे यांनी केले.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!