पिंपरी चिंचवड – महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या पायाभरणीच्या काळात प्रचंड मेहनत घेत सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांच्या कार्यात मोलाची साथ दिली. स्त्री शिक्षणाबरोबर अस्पृश्य सुधारणा, बालहत्या प्रतिबंधक ग्रहातील कार्य तसेच दुष्काळ, प्लेग मधील कार्य या चळवळीत सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला. भारतात स्त्री शिक्षणाच्या पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे कोट्यावधी महिलांचे जीवनात प्रकाश पडला असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी घरेलू कामगार संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे तर्फे सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, निमंत्रक अश्विनी मालुसरे,नीता चव्हाण,अश्विनी काशीद,छाया श्रीमंगले,सुनीता साळुंके,सविता गोपाळे,वर्षा रावळकर, मयुरी कोरे, पूनम पाटील,
मीरा बागल,राजश्री नांदकर, विजूबाई पोटभरे, जयश्री पाटील, बालाजी कदम, सलीम डांगे, राजेश माने आदी उपस्थित होते. (PCMC)
मेहनत, धाडस, निर्भयता हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे विशेष होते. परंपरावादी व्यवस्थेने त्यांच्या कामात अनेक वेळा अडचणी आणल्या, त्रास दिला मात्र त्या डगमगल्या नाहीत भारताच्या सामाजिक इतिहासात त्यांच्या कार्याच्या ठसा वेगळेपणाने उमटला गेला. तसेच बहुजन समाजात समाज प्रेरणेचे कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या त्या प्रेरणादायी ठरल्या, महात्मा फुले यांच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग व स्त्रियांचे मुक्तिदायी समाजकारणास महत्त्वाचे स्थान होते. फातिमा शेख,मुक्ताबाई साळवे, ताराबाई शिंदे व जनाक्का शिंदे यांचेही स्त्री जागरण पर्वाच्या सुधारक कार्यात योगदान ठरले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : सावित्रीबाई मुळे महिलांचे जीवनात प्रकाश – काशिनाथ नखाते
---Advertisement---
- Advertisement -