पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून फिनोलेक्स चौक मोरवाडी येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन घेण्यात आले. (PCMC)
चले जाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यात आणण्यात आले होते त्यावेळी जनप्रक्षोभ होऊ नये यासाठी त्यांना पुणे ऐवजी चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले होते. पिंपरी येथील सर्वे नंबर 23, 24, 25 या वास्तूवर काही काळ त्यांना थांबवण्यात आले होते, ती वास्तू म्हणजे कमला क्रॉस बिल्डींग समोरील मोरवाडी चौकात आहे.
ही ऐतिहासिक वास्तू आहे या ठिकाणास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सदर जागेवर महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी दिनांक 19 जून 2019 रोजी स्थायी समिती करून ठराव मंजूर झाला आहे, आणि या ठिकाणी आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून हे स्मारक या जागेवर उभे करण्यात येणार होते.
या विषयास आज पाच वर्षे झाली पण तरी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक या ठिकाणी उभे झाले नाही. याच विषयाचा पाठपुरावा काँग्रेस पक्षाकडून सातत्याने होत आहे तरी देखील आजवर पालिकेने कुठलीही कारवाई याविषयी केली नाही त्यामुळे आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वामध्ये सत्याग्रह आंदोलन घेण्यात आले.
सदर वास्तूचे ऐतिहासिक जतन व्हावे व गांधीजींच्या स्मारकाचे काम लवकर सुरू व्हावे अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. (PCMC)
दिवसभर शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयुर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, वाहब शेख, बाबासाहेब बनसोडे, डाॅ. मनिषा गरूड, अरूणा वानखेडे, ॲड. संकल्पा वाघमारे, प्रा. किरण खाजेकर, अबूबकर लांडगे, महेश पाटील, राहुल शिंपले, मकरध्वज यादव, गणेश गरड, मिलिंद फडतरे, गौतम ओव्हाळ, सतिश भोसले, वसंत वावरे, विशाल कसबे, राजन नायर, भिमराव जाधव, ॲड. अनिकेत रसाळ, आवेज सय्यद, साजिद खान, समद खान व शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सत्याग्रह आंदोलनात उपस्थित होते.
PCMC : महात्मा गांधी जयंती निमित्त काँग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन
संबंधित लेख