पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ काशीद पार्क यांच्यावतीने आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत “गाडगेबाबा” यांच्या 149 व्या जयंती निमित्त संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (PCMC)
त्यानंतर काशीद पार्क व बीआरटी रोड येथे स्वच्छता अभियान राबविले. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण पवार आपल्या सहकाऱ्यांसह स्वच्छता अभियानात भाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी राहुल ओव्हाळ व इतर स्वच्छता कर्मचारी यांनी या कामी उत्तम सहकार्य केले.
यावेळी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्णा फिरके बोलताना म्हणाले, काशीद पार्क मध्ये 2016 च्या जुन्या नावीन्यपूर्ण आठवणी ला उजाळा देत म्हणाले की 2016 मध्ये 2 ते 3 ट्रक एवढा कचरा होता की लोकांना जाताना नाक दाबून जावे लागत होतं, त्यावेळी वृक्षमित्र अरुण पवार व तानाजी जवळकर यांच्या सहकार्यातून पत्रा शेडची उभारणी करून कचरा टाकायच्या जागी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केले. (PCMC)
स्वच्छता करून त्या ठिकाणी 1 महिनाभर माणूस ठेऊन त्याठिकाणी 6 ते 7 हजार लोकांचे आरोग्य धोक्यात यायचे थांबले. तसेच 2016 च्या स्वच्छता अभियानांतर्गत काशीद पार्क मधील सर्व गल्ल्या, आळंदी, शिरगाव, देहूगाव, गडकिल्ले या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले याबद्दल त्यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांचे आभार मानले.
तसेच यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी प्रथम संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले व उपस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांचेही आभार मानले.
स्वच्छता कर्मचारी रोजच स्वच्छता ठेवतात कारण, तेच खरी देशसेवा करतात, तसेच त्यांनी उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी यांना गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार केला.
शेवटी बोलताना अरुण पवार म्हणाले, असे संत होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे़ असे त्यानी गौरवोद्गार काढले व संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णा फिरके यांचेही त्यांनी आभार मानले की काकांनी सुरुवात स्वतःपासून केली व त्यांचे कार्य युवकांनाही लाजवेल असे आहे कुठलीही जाहिरात न करता त्यांनी सेवा केलेली आहे.
तसेच त्यांनी यावेळी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीचा रविवार किंवा शेवटचा रविवार ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आळंदी, देहू, प्रती शिर्डी शिरगाव तसेच गड किल्ले येथे स्वच्छता अभियान सुरुवात करण्याचा संकल्प केला. (PCMC)
स्वच्छ सर्वेक्षण 2023 व 2024 या दोन्ही वर्षात संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघास महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आजच्या कार्यक्रमात पीसीएमसी पुरस्कृत स्वच्छता चॅम्पियन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, सूर्यकांत भागवत, सूर्यकांत कुरुलकर, दामू राणे, चांदमल सिंघवी, पोपट अण्णा चव्हाण, दौलतराव जाधव, गणेश ठाकरे, शंकर टोपे, विशाल कुंभार, श्रीधर राऊत, श्रीधर साबळे, धनेश कुमार पुरोहित, मोहन भोईटे, दत्तात्रय पाटकर, पितांबर सरोदे, श्री जैन, अशोक नवगण, सुरेश दिघे, अनिल भोळे, शत्रुघ्न धुळे, आनंदराव वानखेडे, दत्तात्रय खताळ, बाळासाहेब वाघ, संजय पाडेकर इत्यादी सदस्य हजर होते.
सर्वांनी तरुणांच्या जोशात स्वच्छता अभियानात भाग घेतला नंतर चहा पाणी होऊन दौलतराव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
PCMC : संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी
- Advertisement -