Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिंचवड येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूल ने राबविले स्वच्छता अभियान

PCMC : चिंचवड येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूल ने राबविले स्वच्छता अभियान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील सेंट अँड्—युज हायस्कूलमधील 120 विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत हातात स्वच्छता आली. अंगणात समाज का अंधारात? स्वच्छ भारत आदर्श भारत, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, माझा भारत स्वच्छ भारत, आदी श्लोगणचे हातात फलक घेऊन घोषणा देत चिंचवड एमआयडीसी परिसरात आज सकाळी रॅली काढून नागरीकात स्वच्छतेविषयी जनजागृती केली. (PCMC)

तसेच शाळा व शाळाबाहेरील परिसरात रस्त्याच्या दुर्तफा बाजूचे प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, आधीची स्वच्छता झाडलोट करून महात्मा गांधी जयंती साजरी केली.

नागरिकांनी कुडा व कचरा कुंडीत टाकून महापालिकेला सहकार्य करावे, असेही जागोजागी आवाहन केले. हायस्कूलचे फादर राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी क्रीडा शिक्षक व्यंकटेश चव्हाण, संजय डोके, शिक्षिका सिल्विया जॉन आदींनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय