Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या आरुष निचल चे आंतरराष्ट्रीय संगीत...

PCMC : एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या आरुष निचल चे आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत उल्लेखनीय यश

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : अखिल लोककला कल्चरल आर्गनायझेशन, थायलंड संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील आठव्या इयत्तेतील आरुश निचल याने द्वितीय क्रमांक पटकावला. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्या अंतर्गत आरूष निचल याने संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (PCMC)

यामधे अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत स्पर्धेत प्रथम आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, उप मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आरूष निचलचे अभिनंदन केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय