Monday, February 3, 2025

PCMC : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रिव्हर प्लागेथॉन अभियान

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपळे गुरव येथे  ह प्रभाग आरोग्य विभागाच्या वतीने पवना माई स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 3 टन र्निर्माल्य संकलित करण्यात आले. यामध्ये फाटके कपडे,देव देवतांचे फोटो ,निर्माल्य नदीपात्रात आढळले. (PCMC)

जागतिक तापमान वाढत असताना अनेक नद्यांचा जीव गुंदमरतोय गेल्या तीन वर्षापासून इंद्रायणी मरत यातना भोकताना आपण पाहतोय याचे गांभीर ओळखून पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रिव्हर प्लागेथॉन अभियान राबविण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच   बेसिक्स टीमचे कर्मचारी तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे संस्थेच्या कार्यकर्तेनी पण स्वयं स्फूर्तीने भाग घेताना पाहावयास मिळाले.

यावेळी पालिका सहाय्यक आयुक्त सचिन पवार म्हणाल्या की, नागरिकांनी नद्याची काळजी घेतली पाहिजे फक्त पालिकेचेच काम नसून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवाला पाहिजे. नदी प्रदूषणामुळे जलचर प्राण्याचे ही अस्तित्व धोक्यात आले आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजन जबाबदार असल्याचे पवार यांनी सांगितले.


यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृती शहराध्यक्ष अण्णा म्हणाले कि, शहरातील सर्वच नद्या नागरिकांनी प्रदूषित केल्या आहेत आणि काही उद्योजक पण यासाठी कारणीभूत आहेत.

एक दोन दिवस नद्या स्वच्छ करून चालणार नाही तर स्वयं स्फूर्तीने नागरिकांनी आपल्या वेळेतील काही वेळ पर्यावरणासाठी दिला पाहिजे. शंकर घाटे मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणाले कि पर्यावरण जगले पाहिजे, नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत जलचर प्राण्याचे जीव वाचले पाहिजेत, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते देणे दिले पाहिजे होता त्या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले. (PCMC)

शांताराम माने सहाय्यक आरोग्य निरीक्षक म्हणाले कि, हातात मोबाईल, घरात फोन, नदीत कचरा टाकतय कोण ?  स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाही तर कायमचे आजारपण. नदीचा कचरा करू कमी, आरोग्याची मिळवू हमी.

यावेळी सचिन पवार सहा.आयुक्त, गणेश देशपांडे कार्यकारी आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, सुनिता पानसरे, क्षेत्रिय आधिकारी, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा संजना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, योगेश फल्ले मुख्य आरोग्य निरीक्षक ,प्रणय चव्हाण आरोग्य निरीक्षक टीमचे झोनल इन्चार्ज सुखदेव लोखंडे, बेसिक्स टीमचे वार्ड इन्चार्ज विजय पेंडे, सा.का.पिंटू जवळकर, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, राहुल जाधव, समाधान कांबळे, परमार नटवरलाल इत्यादी उपस्थित होते.

बेसिक्स टिमचे जगदीश वडोदे यांनी उपस्थितांना पर्यावणाची शपथ दिली तर आण्णा जोगदंड यांनी सर्वाचे आभार मानले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles