गणवेश मुळे सुसूत्रता येते आरटीओच्या कारवाईला विरोध करणार नाही – बाबा कांबळे (PCMC)
पिंपरी चिंचवड – पुणे आरटीओ च्या वतीने गणवेश सक्ती करण्यात आली असून गणवेश न घालणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात असे जाहीर करण्यात आले आहे, या निर्णयाला विरोध करणार नाही, पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकांनी, गणवेश घालावा व व्याज लावावे असे आव्हान देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. (PCMC)
” गणवेश नकोय अशी भूमिका आम्ही यापूर्वी अनेकदा घेतली होती, परंतु त्या पाठीमागे व्यापक विचार होते, रिक्षा चालकांवरती अनेक बंधन लागले जातात आणि एक नियम व अटी लावल्या जातात, परंतु त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, अपघाती विमा, मुलांना शिक्षण, म्हातारपणी पेन्शन आधी कोणत्याही सुविधा मिळत नाहीत नाही, या साठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून कल्याणकारी मंडळाच्या वतीने रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा व इतर लाभ देण्यात यावेत अशी आमची भूमिका होती जोपर्यंत कल्याणकारी महामंडळ स्थापन होत नाही व रिक्षा चालक यांना सामाजिक सुरक्षा मिळत नाहीत तोपर्यंत ड्रेस नको अशी आमची भूमिका होती.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केला असून नोंदणी सुरू केली आहे व वय वर्षे 65 नंतरच्या रिक्षा चालकांना दहा हजार रुपये सन्मानधन देखील दिले जात जाणार आहे. (PCMC)
बाबा कांबळे म्हणाले, मी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर देशव्यापी दौरा केला यावेळी ओडिसा आणि अन्य काही राज्यात ” चालक हे गणवेश घालतात एवढंच नाही तर नेमप्लेटही लावतात यामुळे एक सुसूत्रता येते असं माझ्या लक्षात आलं आहे.
नियमानुसार रिक्षा चालकांना पांढरा शर्ट खाकी पँट असा गणवेश, ठरवण्यात आला आहे, पांढरा शर्ट असल्यामुळे वारावून पाऊस तसेच रिक्षाचे गॅरेज वरती काम करत असताना ऑइल ग्रीस यामुळे पांढरा शर्ट खराब होतो, त्यावर डाग लागल्यास ते निघत नाहीत, यामुळे रिक्षा चालकांना खाकी शर्ट खाकी पँट असा ड्रेस असावा याबाबत सरकारची पत्रव्यवहार करणार असल्याचे यावेळी बाबा कामे म्हणाले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : रिक्षा चालकांनी गणवेश घालावा – बाबा कांबळे
---Advertisement---
- Advertisement -