पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – आपल्याला जे हवे आहे ते माळी,वंजारी म्हणून मिळणार नाही ओबीसी म्हणूनच मिळेल. मात्र आदिवासी व दलित ज्याप्रमाणे संघटित आहेत. त्याप्रमाणे ओबीसी संघटित नाहीत अशी खंत व्यक्त करत असतानाच ओबीसींची मोट बांधण्याचे काम आपल्याला करावे लागेल. (PCMC)
इतरांना जे मिळेल ते आम्हाला मिळायला हवे.येथे आम्हीही आहोत आम्ही स्वस्थ बसणार नाही पेटून उठू. मात्र आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही हे लक्षात घेता सरकारला जागे करावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.
ओबीसींना केवळ राजकारणासाठी आरक्षण नको तर केंद्र व राज्यातून फंड मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी भुजबळ बोलत होते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, रूपाली चाकणकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादीचे नेते निलेश डोके, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, सुरेश भोईर, वसंत लोंढे, रेखा दर्शीले, संगीता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, प्रा कविता आल्हाट, डॉ. नागेश गवळी, मोहन भूमकर आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)
यावेळी भुजबळ म्हणाले की, तुमचा आवाज नसेल तर उपयोग नाही. तुम्ही जिवंत आहात हे दाखविण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या, तेव्हा लोक ते बंद पाडायला आले. लहुजी वस्ताद दांडके घेऊन उभे राहिले. तुमच्याकडे हेही हवे. असे भुजबळ म्हणाले.
राज्यातील महायुती सरकार सावित्रीबाई फुले यांचे काम पुढे नेत आहे. लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत हा त्याचाच भाग आहे.सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण सबलीकरण यासाठी पहिले पाऊल टाकले. त्यांना दगड मारणारे सनातनी होते आणि आमचेही होते.
कारण अंधश्रद्धेचा पगडा होता. कर्मठ ब्राह्मण असे आपण म्हणतो, मात्र सावित्रीबाईंच्या पहिल्या शाळेला जागा भिडे यांनीच दिली. परांजपे,भांडारकर हे महात्मा फुले यांच्या बांधकाम कंपनीत पार्टनर होते. महात्मा फुले यांना विरोध करणारे ब्राह्मण होते.
तसेच सुधारक ब्राह्मण सुद्धा होते. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांविरुद्ध नव्हे तर ब्राह्मण्यवादाविरोधात आणि अंधश्रद्धे विरोधात काम केले. पुढे काही मंडळींनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद वाढवला मात्र महात्मा फुले यांनी सर्वांना पोटाशी धरावे असाच विचार मांडला. महात्मा फुले समजून घ्यायचे असतील तर त्यांचे शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी यासारखी पुस्तके वाचायला हवीत असे भुजबळ म्हणाले. (PCMC)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा विचार दिला. मात्र आम्ही लढाईत मागे राहतो. फायदा घ्यायला मात्र सर्वात पुढे रांगेत असतो. संघटित होऊन लढावे लागेल. असे भुजबळ म्हणाले.
मंत्री अतुल सावे म्हणाले की, विविध क्षेत्रात कार्यरत राहून चांगले काम केलेल्यांचा सन्मान केल्याने इतरांना प्रेरणा मिळते. महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थिनींची यूपीएससीची तयारी करून घेतली.
ओबीसींसाठी 56 वसतीग्रहे बांधली. 36 जिल्ह्यात 72 होस्टेल उभारण्यात येणार आहेत. अरणला अ दर्जा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अरणला 100 कोटी रुपये दिले. आराखडा तयार झाला असून लवकरच काम सुरू होईल. भिडे वाडा आरण प्रश्न मार्गी लागला आहे. नायगाव येथे सावित्रीबाई स्मारक उभे राहत आहे. असे सावे यांनी सांगितले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारार्थिंमध्ये रुपाली चाकणकर (अध्यक्षा, महिला आयोग / विशेष महिला राज्यभूषण), आशाबाई तळेकर (आदर्श माता), मालती भुमकर (आदर्श माता), हभप भाग्यश्री भाग्यवंत – (आध्यात्मभुषण) रेश्मा शेख (फातिमा सावित्री पुरस्कार), पुजा डोके (उद्योगभूषण), अनिता टिळेकर (आदर्श मुख्याध्यापिका), मंगल आहेर (आदर्श शिक्षिका), वैशाली खराडे (आदर्श शिक्षिका), पूनम गुजर (समाजभूषण), सुवर्णा कदम (समाजभूषण),
पल्लवी मारणे (समाजभूषण), रेश्मा कणसे (समाजभूषण), वंदना आल्हाट (समाज भूषण), संध्या स्वामी (संस्कारभूषण), रेणुका हजारे (साहित्यभूषण), हर्षदा भावसार (कलाभूषण), शुभांगी झोडगे (कार्यक्षम अधिकारी), महानंदा घळगे (श्रमभूषण), निलम चव्हाण (कर्तव्यभूषण), ॲड. जया उभे (कायदाभूषण), संगीता येवला ( संगीतभूषण) यांचा समावेश होता.
PCMC
कार्यक्रम आयोजनासाठी हणमंत माळी, सुर्यकांत ताम्हाणे, हभप महादेव महाराज भुजबळ, अनिल साळुंके, प्रशांत डोके, विश्वास राऊत, निलेश डोके, राजेश कर्पे, भरत आल्हाट, संजय जगताप, प्रकाश जमदाडे, नितीन ताजणे, नरहरी शेवते, विजय दर्शले, अमर ताजणे, प्रदीप दर्शले, किशोर माळी, परेश ताम्हाणे, शिवम बर्के, वैजनाथ माळी, रमेश गायकवाड, विलास शेंडे, अपर्णा डोके, अनिता ताठे, आशा माळी, उर्मिला भुजबळ, स्मिता माळी, अलका ताम्हाणे, पुजा साळुंके, शकुंतला शेवते, संगीता पाटील, कुंदा यादव,माया बर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वागत अपर्णा डोके, प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी, सुत्रसंचालन महादेव महाराज भुजबळ यांनी केले, आभार सुर्यकांत ताम्हाणे यांनी मानले.
हे ही वाचा :
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !