पिंपरी चिंचवड – शिवतेज नगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सोमवार दिनांक 31 /4 /25. रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. (PCMC)
सकाळी सात ते नऊ श्रीचा अभिषेक व होम हवन होणार आहे. दहा ते अकरा वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी एक ते दोन कृष्णाई महिला भजनी मंडळ, कृष्णानगर यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी दोन ते तीन ज्ञानही महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, चार ते पाच स्वरांजली महिला भजनी मंडळ शाहूनगर यांचा भजनाचा कार्यक्रम, साडेसहा वाजता जन्मोत्सव, सात वाजता महाआरती, साडेसात वाजता ” भावभक्ती गंगा ” हा भक्त संगीताचा काय होणार आहे. (PCMC)
विनोद कुलकर्णी व त्यांचे सहकारी सादरकर्ते आहेत, रात्री साडेसात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : शिवतेज नगर, चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
---Advertisement---
- Advertisement -