Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:नाना काटे मित्र परिवार आयोजित प्रभू श्रीराम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२२ – रहाटणी व पिपंळे सौदागर येथील रहाटणी मधील श्रीराम मंदीर व पिपंळे सौदागर येथील महादेव मंदीर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन,उमेश काटे सोशल फाऊंडेशन,सागर कोकणे युवा मंच चा वतीने सामुहीक राम आरती,रामरक्षा पठण,भजन, किर्तन,महाप्रसाद वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते,आज राम भजन कार्यक्रम झाल्यानंतर नाना काटे,शितल काटे,उमेश काटे,सागर कोकणे यांच्या हस्ते प्रभु श्रीराम याच्या मुर्तीची सामुदायिक आरती करण्यात आली.

तसेच परिसरातील नागरिकाना आयोध्या येथील सोहळा पाहता यावा यांचे साक्षीदार होता यावे यासाठी कार्यक्रमाचा ठिकाणी  एलईडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात २ दिवस पुर्वी सर्वात प्रथम रहाटणी येथील श्रीराम मंदीराची स्वच्छता विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली होती,तसेच नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे सोशल फाऊंडेशन चा वतीने रहाटणी पिपंळे सौदागर मधील नागरिकाना घरोघरी जाऊन अयोध्या येथील राम मंदीराची प्रतीकृती,पणतीचे वाटप करण्यात आले.

---Advertisement---


या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला,यावेळी परिसरातील रहाटणी,पिंपळे सैदागर मधील भाविक भक्त, भजनी मंडळ,राम मंदीराचे सेवक,शिवशंभो सेवा मंडळांचे सदस्य,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles