सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांचेसोबत कामगार नेते काशिनाथ नखाते यांची बैठक (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध प्रशस्तरस्ते आहेत. मात्र वाहतूक पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे विविध चौकामध्ये, विविध ठिकाणी वाहतूक कोंडी (ट्राफिक जाम) होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. तो दूर करण्यात यावा अन्यथा लवकरच आंदोलनाची भूमिका बाबत पत्र देण्यात आले यावर सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग सतीश कसबे यांनी कामगार नेते काशिनाथ नखाते व शिष्ठमंडळांशी चर्चा केली यावर त्यांनी आपल्या मागण्यावर सकारात्मक विचार करून लवकरच त्या सोडवण्यात येतील असे आश्वासन आज दिले. (PCMC)
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सहदेव होनमने, संभाजी वाघमारे, रवींद्र गायकवाड, संजय कांबळे उपस्थित होते.
रस्त्यावर असलेले खड्डे व वाहतुकीचा प्रचंड ताण लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे वाहतूक पोलीस इतर कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्याकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. विशेषतः काळेवाडी फाटा, शगुन चौक, टिळक चौक निगडी, दुर्गानगर चौक, चिखली, तळवडे, त्रिवेणी नगर चौक, आकुर्डी चौक, मोरवाडी चौक, साने चौक थरमॅक्स चौक परिसरात अवैध थांबा, अनेक वेळेला खूप मोठ्या प्रमाणात कोंडी होते आहे. सांयकाळी वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. अवैध पार्किंग मुळे सामान्य नागरिकांचा प्रवास अवघड झाला आहे.
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनावरती कारवाई सुरू असून चुकीच्या कामाचे समर्थन पोलीस विभागाकडून करण्यात येणार नाही त्याचबरोबर दंडात्मक कारवाई सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
***
***
***
**
***
***
***
***
***
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती