Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मोशी येथे उभारण्यात येणा-या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे कामाबाबत

PCMC : मोशी येथे उभारण्यात येणा-या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे कामाबाबत

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेल्या से.क्र. ५ व ८ मधील जागेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सद्यस्थितीत चबुत-याचे काम चालू आहे. (PCMC)

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १००फूट उंच ब्रॉझ मधील पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. राम सुतार करीत असून दिल्ली येथील फाउंड्री येथे पुतळ्याची निर्मिती करण्यात येत आहे. सदर पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आयआयटी मुंबई यांचे मंजूर संरचनेनुसार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सदर पुतळ्याचे काही भाग दिल्ली येथून पिंपरी चिंचवड येथे ट्रकने वाहतूक करून मोशी येथे आणण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष पुतळा उभा करणे पूर्वी, पुतळ्यासाठी ब्रॉझ धातूने सांधे जोडणी व इतर आवश्यक प्रक्रिया प्रत्यक्ष जागेवर केल्यानंतर प्रत्यक्षात पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. या कामावरही आयआयटी मुंबई येथील तज्ञांची देखरेख राहणार आहे. (PCMC)

सदर कामात त्रुटी असल्याचे दाखवून, सदर पुतळ्याचे एका भागाचे काही व्यक्ती फोटो व्हायरल करीत आहेत.

तथापि सदर कामातील पुतळ्याची उभारणी ही अद्यापही चालू नसल्याने या बाबींमध्ये अजिबात तथ्य नाही.त्यामुळे नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय