पिंपरी चिंचवड – वाहतूकदार कष्टकरी सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा अर्थसंकल्प अजित दादा पवार यांनी मांडला. सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. (PCMC)
महत्वाकांक्षी योजनांना निधीचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता केंद्रीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहाय्य , सार्वजनिक मालमत्तेचे मुद्रीकरण, योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम चांगला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे. अजित दादांनी ११ वेळ अर्थसंकल्प मांडला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. (PCMC)
– बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत., महाराष्ट्र रिक्षा पंचायत,