Tuesday, February 11, 2025

PCMC : ताथवडेमध्ये रंगली गणेश पोदार फुटबॉल चॅंपियनशिप स्पर्धा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “गणेशजी पोदार इंटरस्कूल फुटबॉल चॅम्पियनशीप”, स्पर्धेत पोदार स्कूलच्या चिंचवड, पिंपरी, वाकड शाखेने बाजी मारली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, मशाल प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटक “म्यॅथु स्पोर्ट्स अकादमी” चे संचालक म्यॅथु एस हे होते. यांच्यासह पुणे विभाग पोदार स्कूल पुणे विभागाचे महाव्यवस्थापक शेखर दगडे, डी एस जे फ्रॅंकलीन, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक अग्नेल कार्व्हालो, एच आर मॅनेजर बिपीन महाजन, इतर पोदार शाळांचे मुख्याध्यापक संजीव भारद्वाज, नीता कुमार, अनघा घोलप, अर्चना करांडे, स्मिता पॅटरसन, शहनाज कोट्टर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पोदारच्या पुणे विभागातील शाळांच्या १७ वर्षाखालील / १४ वर्षा खालील मुले आणि मुलींच्या २७ संघानी आपला सहभाग नोंदविला. १४ वर्षा खालील मुलींचा अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाकड व पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी यांच्या मध्ये खूप चुरशीचा झाला. या मध्ये कुमारी आरणा गुरु, हेजल जोखानी व आरुषी टाकळकर यांनी प्रत्येकी एक – एक गोल करून तीन शून्य अशा फरकाने विजेतेपद पटकाविले. कुमारी दिया जोखानी हिने आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोल कीपिंग केल्याने, 14 वर्षा खालील संघाची उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला निवडण्यात आले.

17 वर्षा खालील मुलींचा अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी व पोदार इंटरनॅशनल स्कूल, सारा सिटी चाकण संघामध्ये झाला व अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी संघाने एक शून्य फरकाने जिंकला. कुमारी ऊर्जा कपिल, पिंपरी संघाच्या खेळाडूला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नावाजण्यात आले.

मुलांच्या 14 वर्षा खालील अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाकड विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी मध्ये खूप चुरशीचा झाला. सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आउट मध्ये पिंपरी संघाने दोन शून्य फरकाने सामना जिंकला. पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाकडचा कुमार राजवीर राजपूतला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्याने एकूण संपूर्ण स्पर्धेमध्ये सात गोल केले होते.

17 वर्षा खालील मुलांचा अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल, सारा सिटी चाकण यांच्या मध्ये झाला. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी संघाने दोन शून्य फरकांनी विजेतेपद पटकावले. पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव या संघाच्या कुमार सोहम देशमुख याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविले.

स्पर्धेचे पंच म्हणून आकाश पोखरकर यांनी मुलांच्या 14 व 17 वर्षा खालील सर्व सामान्यांमध्ये पंच म्हणून सन्मानाने व उत्कृष्ट पद्धतीने काम केले. तसेच ऋषिकेश सोनवणे यांनी 14 व 17 वर्षा खालील मुलींच्या सामन्यांमध्ये खूप व्यवस्थित व चांगले पंच म्हणून काम पाहिले.

विजेते संघ खालील प्रमाणे
मुले सतरा वर्षाखाली
प्रथम – पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
द्वितीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव
तृतीय- पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी.

मुली सतरा वर्षा खालील
प्रथम – पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
द्वितीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, सारा सिटी, चाकण
तृतीय – पोदर इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव
मुले 14 वर्षाखालील
प्रथम – पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
द्वितीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाकड
तृतीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, सारा सिटी, चाकण
मुली 14 वर्षाखालील
प्रथम – पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाकड
द्वितीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
तृतीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका आर. सोनावणे, पर्यवेक्षक समीर इनामदार, क्रीडा शिक्षक समीर देशमुख व शिक्षकेतर कर्मचारी पराग खंडेलवाल, रुपेश महाणवर, साक्षी कडू, आनंद थोरात, युवराज शेळके, प्रकाश पाटील, सीमा महाजन, आदिती ढवळे, तनय खाबिया, महेश पाटील, संदीप कदम इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
विजेत्यांना प्रमाणपत्रे, सन्मान चिन्हे देऊन, आभार प्रदर्शनाने जल्लोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles