पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:चिंचवड मध्ये प्रथमच भव्य रांगोळीच्या माध्यमातून प्रभू श्री रामांची प्रतिकृती साकारण्यात आली.
चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप,भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते या रांगोळीतून साकारलेल्या श्रीराम प्रतिकृतीचे उदघाटन करण्यात आले.या वेळी अनेक माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

‘क’ कॅलिग्राफी संस्थेच्या माध्यमातून व अनेक रामभक्तांच्या सहयोगाने कै.मुरलीधर माचुत्रे व्यायाम शाळा जुन्या तालेरा हॉस्पिटल जवळ,पोदार शाळा रोड काकडे पार्क,चिंचवड मध्ये 50×20 फूट अशा मोठ्या स्वरूपात सर्वांना दि. 21 व 22 जानेवारी रविवारी आणि सोमवारी सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवली होती.
उदघाटन प्रसंगी आयोजक शरद कुंजीर ‘क’ कॅलिग्राफी संस्था,मधुकर ब.बच्चे,सदस्य: क’ कॅलिग्राफी संस्था,सचिव:भाजपा पिं चिं शहर,सदस्य:महाराष्ट्र महावितरण समिती तसेच भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे,भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे,माजी नगरसेवक सुरेश भोईर,राजेंद्र गावडे,अश्विनी चिंचवडे ,मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, संदीप नखाते, भाजपा महिला माजी अध्यक्षा उज्वला गावडे, रवींद्र देशपांडे,विनोद तापकीर,संदीप नखाते,प्रसाद कस्पटे, योगेश चिंचवडे,साई कोंढरे,शिवम डांगे,मच्छिन्द्र थोरवे,रोहिणी बच्चे, पल्लवी पाठक,दीपाली कलापुरे,पल्लवी मारकड,
आदी मान्यवर उपस्थित होते.

क कॅलिग्राफी चे शरद कुंजीर,स्वप्नाली काळे,अनिता रोकडे,ममता पाटील,आरती जोशी,सदाशिव कांबळे,मानसी घोलकर, सोनाली निमसे,सचिन शिरसे,कांचन निकुंभ,अनिता रोकडे,अक्षय रसाळ,ऋषाली चव्हाण,वंदना सोनवणे,विजय सोनवणे,राहुल फापले,शिद्धी औटी ,शरद,कुंजीर आदी कलारांनी ही भव्य रांगोळी साकार केली
वरील रांगोळी सकारण्यासाठी मनसे विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे,स्वछता राजदूत अविनाश निमसे,ईशा नेत्रालय ,पुना गाडगीळ,सुमित काटकर,गणेश कांबळे,जीवन पऱ्हाड, विलास यादव आदी अनेक मान्यवर व नागरिकांनी सहकार्य केले आहे.
पहिल्याच दिवशी 1500 पेक्षा जास्त रामभक्त नागरिकांनी या उपक्रमास भेट दिली व कौतुक केले.सोमवारी 22 रोजी किमान 3000 पेक्षा जास्त नागरिक या उपक्रमास भेट दिली म्हणजे जवळपास 5000 लोकांनी या रांगोळी श्रीराम प्रतिकृतीस भेट दिली
येणाऱ्या नागरिकांना मधुकर बच्चे यांच्या वतीने लक्की ड्रॉ वतीने विजेत्यांना श्रीराम मंदिर प्रतिकृती भेट म्हणून ठेवण्यात आली होती.
ईशा नेत्रालाय वतीने येणाऱ्या नागरिकांना मोफत डोळे तपासणी कुपन दिले जात होते व त्वरित आवश्यक असणाऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने डोळे तपासणी केली जात होती.
येणारा प्रत्येक नागरिक या ठिकाणी येऊन समाधान झाल्याचे आवर्जून सांगत होते तर अनेक पत्रकार येऊन श्यक्य तेवढी प्रसिद्धी देऊन कौतुक पण करीत होते.आणखी काही दिवस हि रांगोळी ठेवावी अशी नागरिकांची इच्छा होती.