पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर – निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे मैदानात डॉक्टर ऋषी अजित जगताप लिखित “राजा शिवछत्रपती” ह्या ऐतिहासिक क्षेत्राशी निगडित अशा पुस्तकाचे प्रकाशन ह भ प किसन महाराज चौधरी यांच्या हस्ते औक्षण करून झाले. (PCMC)
या पुस्तकाला किसन महाराज चौधरी यांचीच प्रस्तावना आहे. हा प्रकाशन समारंभ हिंदू साम्राज्य दिनी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.या समारंभासाठी निगडी, प्राधिकरण परिसरातील नागरिक,मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करतांना डॉक्टर अजित जगताप यांनी उपस्थितीतांचे स्वागत करून पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ‘राजा शिवछत्रपति एक दिव्य अद्वितीय योध्दा’ हे आणखी एक शिवचरित्र कशासाठी? (PCMC)
आजही भारतीय संस्कृती नष्ट करण्याची अनेकानेक षडयंत्र सुरू आहेत. लोकांना लुटणे, बळजबरीने किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करणे, महिलांवर अत्याचार व अपहरण, गोहत्या, लव्ह जिहाद, लैंड जिहाद, पॉप्युलेशन जिहाद, अशी अनेक आक्रमणे अजुनही सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. असे प्रसार माध्यमातून वाचावयास मिळते. आज राष्ट्रभावना कमी होताना दिसते. छात्रतेज लोप पावतंय, यावर उपाय म्हणून सारखे प्रयत्न करत राहून शिवचरित्र, रामायण, महाभारत, क्रांतिकारकांच्या संघर्षाच्या कथा, याबद्दल सातत्याने बोलणे, लिहिणे आवश्यक वाटते. यातूनच बदल होईल म्हणून हा प्रपंच.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करविला अन् हिंदू साम्राज्य दिन सुरू झाला. त्याला २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक, आदर्श प्रशासक, कालानुरूप बदलणारे, धर्मसंस्था स्थापन करणारे, मंदिराची स्थापना करणारे, सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधातले हिंदू धर्मरक्षक होतेच. पण स्वदेशी व स्वभाषा याबद्दल महाराज प्रचंड जागृत होते. (PCMC)
प्रत्येकाने अभिमानाने सांगावा असा आपला दैदीप्यमान इतिहास आहे. फक्त आपण तो वाचला पाहिजे आणि जीवनात अवलंबिलाही पाहिजे.”
आजच्या शिवराज्याभिषेकदिन म्हणजे हिंदू साम्राज्य मंगलदिनी पुस्तक प्रकाशन करण्याचे संधी मिळाली हे ही माझे सौभाग्य समजतो.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अखिल शिवराज्याभिषेक समिती, यमुना नगर यांनी केले होते. सुंदर सूत्रसंचालन व आभार आदित्य कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिववंदना घेऊन करण्यात आली तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पुस्तक प्रकाशन समितीतील स्वाती देशपांडे, धनंजय इंगळे, अनंत कुलकर्णी, मोहन बेदरकर प्रज्ञेश भोईर, योगेंद्र देशपांडे, शिल्पा देशपांडे व मोरया प्रिंटर्स या सर्वांनी अथक परीश्रम घेतले. प्रसंगी गिरीश देशमुख, शिवानंद चौगुले, नगरसेवक उत्तम केंदळे , नगरसेवक सचिन चिखले , नगरसेविका कमलताई घोलप , रा स्व संघाचे नगर कार्यवाह अशोक वाळके पाटील , रा स्व संघाचे प्रांत अधिकारी रवीजी कळमकर , संस्कृती संवर्धन महासंघाचे अध्यक्ष किसन महाराज चौधरी , आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील , यमुनानगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.