साडे चाराशे नागरिकांची तपासणी (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिक मोठया प्रमाणावर आजारी पडत आहे.आजार टाळण्यासाठी आपले आहार,- विहार,आचार-विचार शुद्ध ठेवले पाहिजेत. असे मत प्रीस्टाईन चॅरिटी फौंडेशनचे संचालक डॉ.प्रवीण बढे यांनी व्यक्त केले.
प्रीस्टाईन चॅरिटी फाउंडेशनच्या वतीने पिंपळे निलख, चिंचवडगाव, पिंपळे सौदागर या तीन ठिकाणी हे शिबीर घेण्यात आले. (PCMC)
ज्येष्ठ नागरिक संघांचे नितीन इंगवले ,पिंपळे सौदागर येथील उन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय भिसे , आणि चिंचवडगाव येथील सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. तिन्ही ठिकाणी घेण्यात आलेल्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने शरीराची संपूर्ण तपासणी करीत मार्गदर्शन केले. यामध्ये 38 प्रकारच्या तपासण्यांचा समावेश आहे. (PCMC)
बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येक घरात आजाराचे प्रमाण वाढले आहे, या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून योग्य आहार विहार आणि पथ्य पाळून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. असा सल्ला डॉ. बढे यांनी दिला. या शिबिरात सुमारे साडे चारशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


हेही वाचा :
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत