पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – विदर्भ सहयोग मंडळाच्या वतीने प्राधिकरणातील विदर्भ भवनामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मूळचे विदर्भाचे असलेले व सध्या पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेले विदर्भवासीय उपस्थित होते. (PCMC)
कार्यक्रमास माजी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश निर्मळ, मंडळाचे अध्यक्ष दिगंबर इंगोले, हेमंत जिडेवार, सुनील राऊत व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी किशोर पवार,शाळीग्राम तायडे, कांता तायडे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ. इंगोले यांनी प्रास्ताविकामध्ये मंडळाच्या कार्याची माहिती देऊन शहरातील सर्व विदर्भवासी यांनी एकत्र येऊन महासंघ स्थापन करावा, असे आवाहन केले.
राजेश भड यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी घोडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दिगंबर इंगोले (अध्यक्ष), शालीग्राम तायडे (कार्याध्यक्ष), अरुण इंगळे (सचिव), दिलीप अं.देशमुख, सारंगधर पल्हाडे (दोघेही उपाध्यक्ष), हेमंत जिड्डेवार (खजिनदार), राजेश भड, सुनील राऊत ( सहसचिव), देविदास आढे,
कल्पना तिजारे, शिवाजी घोडे, अमोल पल्हाडे, ज्ञानेश्वर गावंडे (सर्व कार्यकारिणी सदस्य) यांनी विशेष परिश्रम घेतले.