पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षाच्या परीक्षेत चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी संचलीत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. (PCMC)
सालाबाद प्रमाणे या वर्षीही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल एकूण निकाल 96 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, संचालिका डॉ.तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी यशस्वी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कला शाखेतून प्रथम क्रमाक सानिका नवनाथ मापरे 94.83 टक्के गुण प्राप्त करुन पटकाविला, वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक शिवम कमलाकर गुंजाळ यांने 93.44 टक्के गुण प्राप्त करुन मिळविला, तर विज्ञान शाखेतून अंबर गिरीश चाकवते 93.83 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम आला. (PCMC)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश
---Advertisement---
- Advertisement -