पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.पल्लवी चव्हाण यांच्या कार्याची दखल कोल्हापूरच्या नामांकित आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने 2024 चा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. (PCMC)
आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांचे वतीने दरवर्षी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. पल्लवी प्रशांत चव्हाण यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील मोलाची कामगिरी व कार्य पाहून त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. (PCMC)
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व गोवा याच्या राज्यातून सुमारे 250 प्रस्ताव अन्नगंगा फाउंडेशन पुरस्कार निवड समितीकडे आले होते. त्यातूनच नारीशक्ती व आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले.
सदर पुरस्कार समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री माताजी मठाधिपती ओम शिवकालीन मठ नरंदे तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा च्या संचालिका डॉ. साधना पाटील तर; कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ.विराट गिरी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.तानाजी पवार यांनी सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षक कुटुंबीय यांचे आभार मानले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा, खजिनदार डॉ.भुपाली शहा, बी.एड. च्या प्राचार्या डॉ.पोर्णिमा कदम व प्राध्यापक वर्गानी त्यांचे कौतुक करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.