Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त एस. बी. पाटील आर्किटेक्चर मध्ये काव्यवाचन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनमध्ये गुरूवारी (दि. २७ फेब्रुवारी) काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)

---Advertisement---

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुसुमाग्रज, शांता शेळके, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे सादरीकरण केले. सिद्धी भगत, कादंबरी कुंभार, सुदर्शन तौर, ऋतुजा वारिंगे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

तसेच आर्किटेक्ट स्वप्नील सेठ यांनी मराठी भाषेतील शब्दांची व्याप्ती आणि त्यांचे अनोखेपण याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे मराठी साहित्याचे वाचन करून स्वरचित कविता, लेख, मनातील संकल्पना व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा असे मत प्राचार्या स्मिता सूर्यवंशी यांनी केले. ग्रंथपाल पूनम सांगळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. (PCMC)

---Advertisement---

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा :

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles