राजकीय नेत्यांच्या सभा, प्रचार दौ-यांच्या नियोजनावर झाली चर्चा
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval lok sabha) पिंपरी, चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक रविवारी (दि.३० मार्च) चिंचवडमध्ये पार पडली. या बैठकीत मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा, मेळावे, राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार दौ-यांच्या नियोजनावर चर्चा झाली. PCMC NEWS
नियोजन बैठकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्ष, संघटना यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने आपण सामोरे जात आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी व चिंचवड विधानसभख मतदारसंघाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रचाराचे योग्य नियोजन व सर्व पक्ष, संघटना यांच्यात समन्वय साधून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचा निश्चय उपस्थित पदाधिका-यांनी केला. PCMC NEWS
या नियोजन बैठकीसाठी मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख योगेश बाबर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आम आदमी पक्षाचे वैजनाथ शिरसाठ, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनिल रोहम, अमीन शेख, नागरी सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, शहर युवा सेनाप्रमुख चेतन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक
---Advertisement---
- Advertisement -