पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित (pcmc) या संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) मंगळवारी (दि.२८ मे) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कामगार कल्याण विभाग अधिकारी प्रमोद जगताप, सह शहर अभियंता गलबले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा सभासदांना १२ % दराप्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला. सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष सभासद असणाऱ्या सभासदांचा रोख पाच हजार रुपये व शाल, स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व राज्यस्तरीय खेळाडूंचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सनी कदम, उपाध्यक्ष अनिल लखन, सचिव वैभव देवकर, खजिनदार विजया कांबळे, संचालक चारुशीला जोशी, नथा मातेरे, विश्वनाथ लांडगे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, ज्ञानेश्वर शिंदे, विजय नलावडे, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, योगेश रानवडे, विशाल भुजबळ, विजय मुंडे, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे युनूस पगडीवाले व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार आदी उपस्थित होते.
सर्व विषय सचिव वैभव देवकर यांनी वाचून दाखवले सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. pcmc news
संस्थेचे सल्लागार मनोज मात्रे माछरे, नितीन समगिर, दिगंबर चिंचवडे, महादेव बोत्रे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे व प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे, किसन आरजे, देवराम जगदाळे सुहास ताकवले आदी उपस्थित होते.
स्वागत सनी कदम, सूत्रसंचालन प्रल्हाद सुतार आणि आभार अनिल लखन यांनी मानले.


हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक