पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी वाई येथील मॅप्रो कंपनीच्या कारखान्यात भेट देण्यात आली. प्रा. सुप्रिया कुलकर्णी, प्रा. इश्तप्रीत कौर, प्रा. देवेंद्र देसाई, प्रा. राजेश पाटील, प्रा. प्रसाद तांबे आणि प्रा. दुर्गेश पुराणिक यांच्यासह विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्राचार्या डॉ. स्मृती पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. (PCMC)
मॅप्रो फूड्स या उद्योग समूहाच्या कारखान्याला भेट देत विद्यार्थ्यांनी अन्न प्रक्रिया, उत्पादन, व्यवस्थापन, विपणन आणि उद्योगाच्या विविध टप्प्यांबाबत माहिती घेतली. उत्पादन प्रक्रियेत वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, मशीनरीचा वापर आणि गुणवत्ता नियंत्रण याविषयी माहिती मिळवली. या दौर्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळण्यास मदत झाली.(PCMC)
पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.