Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : गणेश विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी पिंपरी कॅम्प सायंकाळी बंद

PCMC : गणेश विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी पिंपरी कॅम्प सायंकाळी बंद

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : सालाबाद प्रमाणे गणपती विसर्जन मिवणुकीसाठी पिंपरी चिंचवड व्यापारी वर्ग देखील सज्ज झालेला आहे. या गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिंपरी कॅम्प, मार्केट येथील पिंपरी मर्चंट फेडरेशनचे सर्व व्यापारी सभासद या उत्सवात सहभागी होणार आहेत. (PCMC)

गणपती विसर्जन मिरवणूक निमित्त सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होइल. वाहतुकीस अडथळा होऊ नये व सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांना देखील या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी (दि. १६ व १७) सायंकाळी सहा नंतर व्यापारी उस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवणार आहेत अशी माहिती पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय