Sunday, September 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पीसीईटीचे राष्ट्रीय डीडी - रोबोकॉन स्पर्धेत घवघवित यश

PCMC : पीसीईटीचे राष्ट्रीय डीडी – रोबोकॉन स्पर्धेत घवघवित यश

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : नवी दिल्ली येथे दूरदर्शन आणि आयआयटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोबोटिक “डीडी रोबोकॉन २०२४” या नामांकित स्पर्धेत पीसीसीओई च्या ‘टीम ऑटो मॅटन्स’ च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम उपविजेता पदाचे बक्षीस पटकावले. (PCMC)

स्पर्धेत या वर्षी व्हिएतनामची ‘हार्वेस्ट डे’ ही थीम होती. पीसीसीओई च्या संघाने सलग बाराव्या वर्षी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असुन या टीममध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (एआयएमएल) विभागातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. (PCMC)

विद्यार्थ्यांनी एक मॅन्युअली ऑपरेट केलेला आणि दुसरा पूर्णपणे स्वयंचलित अशा दोन रोबोट्सची रचना आणि निर्मिती सादर केली. मॅन्युअल रोबोट नियुक्त केलेल्या ठिकाणी रोपे लावू शकतो आणि स्वयंचलित रोबोट सिलोसमध्ये धान्य हस्तांतरित करू शकतो.

तीन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून अंतिम फेरीत “डीडी रोबोकॉन २०२४” मध्ये राष्ट्रीय प्रथम उपविजेता क्रमांक पटकावला.

अमेय अग्निहोत्री, रूपेश कुमावत, आदित्य शिंदे, अभिषेक ननावरे, विराजस जोशी, निलेश नागुरे यांचा प्रमुख सहभाग होता. प्रा. डॉ. संजय माटेकर आणि प्रा. डॉ. वर्षा बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले. (PCMC)

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

संबंधित लेख

लोकप्रिय