शेतकऱ्यांसाठी मोर्चा महत्त्वाचा ठरेल -अमोल कोल्हे .
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२७ – केंद्र सरकारचे शेतकऱ्यांकडे ,कामगारांकडे दुर्लक्ष झाले असून संसदेमध्ये बोलणाऱ्यांची बोलती बंद केली जाते , त्यांचे निलंबन केले जाते आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी कामगार कामगारांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.
राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, किरण साडेकर, नाना कसबे, ओम प्रकाश मोरया,सलीम डांगे, राजेश माने ,विठ्ठल मोरे, जयंत माने, आदीसह कामगार बहुसंख्येने सहभागी झाले.
कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी,दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानी पणाला आळा घालावा, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा आज किल्ले शिवनेरी पासून ओतूर, आळेफाटा ,नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण परिसरापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील कामगार आणि सहभाग नोंदवला.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : शेतकरी आक्रोश मोर्चात कष्टकरी कामगारांचा सहभाग.
---Advertisement---
- Advertisement -