श्रीराम जन्माचा उद्देश सत्तमार्ग, जगाच्या कल्याणासाठी; रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारले असून २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली आहे. यानिमित्ताने सचिन प्रभाकर सानप व श्रीकृष्ण मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तुळशी रामायण कथा सोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २९ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत पेठ क्रमांक २०, कृष्णानगर, चिखली रोड मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार असल्याची माहितीआयोजक सचिन प्रभाकर सानप यांनी माहिती दिली आहे.

दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्म, सीता स्वयंवर, केवट कथा, शबरी उद्धार, लंका दहन व रावण वध, श्रीराम राज्याभिषेक असे दैनंदिन कथेचे विषय राहतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाग्य व्यासपीठ असणार आहे. २९ जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात येणाऱ्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असून, ९-१० हजार लोकांची बैठकव्यवस्था केली जाणार आहे. त्यामध्ये भारतीय बैठक व खुर्च्या असणार आहेत. व्यवस्थेसाठी परिसरातील विविध सामाजिक, धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते योगदान देणार आहेत असे संस्कृती संवर्धन भजन महासंघाचे अध्यक्ष अर्चना सोनार यांनी सांगितले.
नागरिकांची प्रवासाची, पार्किंगची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. फिरते शौचालय, प्रथमोपचार, अग्निशामकदल, पाण्याची सुविधा येणाऱ्या नागरिकांसाठी उपल्बध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सात दिवस चालणाऱ्या ‘तुळशी रामायण कथा सोहळा’ कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे,” असे आवाहनही शिवानंद चौगुले यांनी केले आहे.