Wednesday, February 5, 2025

PCMC : पीसीसीओई मध्ये गुरुवारी ‘नमस्ते जपान’चे आयोजन

टोकियो युनिव्हर्सिटी आणि पीसीसीओईचा संयुक्त उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि टोकियो युनिव्हर्सिटीचे दिल्ली ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नमस्ते जपान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पीसीसीओई निगडी येथे गुरुवारी (१४ मार्च) होणार आहे.

जपान मधील उच्च शिक्षण, संशोधन, जपान मधील शॉर्ट टर्म इंटर्नशिप आदी क्षेत्रातील संधी या विषयांवर कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली जाणार आहे. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफिस, दिल्लीचे संचालक डॉ. ताकाहिरो काटो यांच्यासह जपान मधील महत्त्वाचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी तसेच इतर महाविद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी जपान मध्ये करिअर आणि संशोधन करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा आणि आपला अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी
https://forms.gle/2gdaf88u8nwdqxod9 येथे संपर्क साधावा असे आवाहन पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ.गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles